पण असे असले तरी काही महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीयेत. कारण माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सरकारने काही नियम आणि पात्रता निश्चित केल्या आहेत. त्यानुसार ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीत. ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता आहे, त्यांना या योजनेचा एकही रूपया मिळणार नाही.
कुटुंबातील कोणत्याही सदस्याला भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात नियमित, कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून नोकरीत असेल तर त्यालाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. महिला किंवा तिच्या कुटुंबातील कोणतीही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही मंडळ, महामंडळ, मंडळ किंवा उपक्रमाची अध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असावी. किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर ट्रॅक्टरशिवाय चारचाकी वाहन आहे. किंवा महिला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांकडे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे.